दुरूनच घ्या,बाप्पांचे दर्शन

सरकारची नियमावली
मुंबई | प्रतिनिधी |
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने गणेशोत्सवासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे.त्यानुसार आता प्रत्येकाला सार्वजनिक ठिकाणी बाप्पांचे दर्शन दुरुनच घ्यावे लागणार आहे. राज्य सरकारने याबाबत कडक नियम जारी केलेले आहेत.त्यानुसार आता घरगुती गणेशमुर्ती आणणे वा विसर्जनासाठी फक्त पाच जण, तर सार्वजनिक बाप्पांसाठी 10 जणांनाच सहभागी होता येणार आहे.
राज्य सरकारकडून गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर त्यानुसार भाविकांना मंडपात जाऊन बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. तर गणेश मंडळांनी बाप्पाच्या दर्शनाची ऑनालईन तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सोय करुन द्यावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

Exit mobile version