पनवेल मनपाची ऑफलाईन सर्वसाधारण सभा घ्या

प्रीतम म्हात्रे यांची मागणी
पनवेल | वार्ताहर |
पनवेल महापालिकेची 20 ऑगस्ट रोजी होणारी सर्वसाधारण सभा ऑफलाईन घेण्याची मागणी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्ष नेते, प्रीतम म्हात्रे यांनी आयुक्ताकडे केली आहे. राज्य सरकारने नव्याने काढलेल्या कोविड अध्यादेशानुसार, बर्‍याच गोष्टींमध्ये शिथिलता बहाल केलेली आहे. रेल्वे, नाट्यगृह, मॉल्स 50% क्षमतेने वा ज्यांचे लसीकरणाचे 2 डोस पूर्ण आहेत, त्या नागरिकांकरिता खुले करण्यात आलेले आहे. तरी सदर नियमावलीप्रमाणे 20 तारखेला आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे होणारी पनवेल महानगरपालिकेची महासभा, लसीकरणाचे 2 डोस पूर्ण झालेल्या नगरसेवकांच्या उपस्थितीत किंवा सत्ताधारी पक्षातील संख्याबळाच्या 50 % नगरसेवक व विरोधी पक्षातील संख्याबळाच्या 50% नगरसेवकांच्या उपस्थितीत व मुक्त वातावरणात संपन्न व्हावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते, प्रितम म्हात्रे यानी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Exit mobile version