निवडणुकीसाठी तळा प्रशासन सज्ज

तालुक्यात 55 मतदान केंद्रावर मतदान

। तळा । वार्ताहर ।

देशाच्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तळा प्रशासन सज्ज झाले असून तालुक्यातील 55 ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. या मतदान केंद्रावरील मतदान मशिनसह इतर साहित्य अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत सील करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी रायगड मतदार संघातून विविध पक्षाचे व अपक्ष मिळून 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. ज्यामध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते व महायुतीचे उमेदवार तटकरे या दोघांमध्ये मुख्य लढत होणार आहे. तालुक्यात लोकसभेसाठी मतदान करणार्‍या नागरिकांची संख्या 37,434 एवढी असून यामध्ये पुरुष मतदार संख्या 18,603, तर स्त्री मतदार संख्या 18,831 एवढी आहे.

तळा प्रशासनातर्फे दिव्यांगांनीदेखील आपल्या मतदानाचा हक्क बजावावा यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये दिव्यांगाना घरूनच मतदान करणे, मतदान केंद्रावर व्हीलचेअरची व्यवस्था, रॅम रेलिंग, जाण्या-येण्याची वाहन व्यवस्था, तसेच दिव्यांगांना स्वयंसेवक, मदतनीस इत्यादी सोय करण्यात आली आहे. तालुक्यातील एकही नागरिक मतदानापासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनातर्फे युद्धपातळीवर तयारी करण्यात आली असून तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन देखील तळा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version