लोणशी मोहल्ला स्पर्धेत तळ्याचा एमसीसी मेठ मोहल्ला विजयी

माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील एव्हरग्रीन क्रिकेट क्लब लोणशी मोहल्ला आयोजित मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत एमसीसी क्रिकेट क्लब मेठ मोहल्ला तळा संघाने अंतिम सामन्यात साई क्रिकेट संघाचा पराभव करीत प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोख रुपये 25 हजार व आकर्षक चषक पटकाविले. स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील नामवंत अशा 24 संघानी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत एमसीसी मेठ मोहल्ला तळा संघाकडून कर्णधार सरफराज गोटेकर उपकर्णधार हिदायत चिपळूणकर,बाबु फुलारे नईम रहाटविलकर,मनीष तळकर,निलेश तळकर , सऊद करदेकर,सूरज चव्हाण, इकराम करदेकर ,दिपेश महाले,नितीन बाईत, शादाब रहाटविलकर आदींनी विशेष चमक दाखविली. माणगाव तालुक्यातील लोणशी येथील भव्य मैदानावर एव्हरग्रीन क्रिकेट क्लब लोणशी मोहल्ला संघाने दि.3,4 ते 5 जानेवारी 2022 रोजी स्पर्धेचे नेटके आयोजन केले होते. या स्पर्धेत उपविजेते ठरलेले साई क्रिकेट संघास रोख रुपये 15 हजार व आकर्षक चषक, तृतीय क्रमांकाचे विजेते महेर एलेव्हन टेमपाले संघास रोख रुपये 7 हजार व आकर्षक चषक तसेच इतर वैयक्तिक बक्षिसांमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून साई क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज वलिद बंदरकर, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून एमसीसी मेठ मोहल्ला तळा संघाचा द्रुतगती गोलंदाज दिपेश महाले,अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून तळा मेठ मोहल्ला संघाचा आक्रमक शैलचा फलंदाज नईम रहाटविलकर तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी दिला जाणार्‍या मालिकावीर बक्षिसासाठी स्पर्धेत चार सामन्यात तडाखेबंद अशा 110 धावा फटकविणार्‍या एमसीसी तळा मेठ मोहल्ला संघाचा सलामीचा आक्रमक फलंदाज हिदायत चिपळूणकर यांची निवड करण्यात आली.या सर्वांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणशी मोहल्ला येथील प्रसिद्ध हिंदी समालोचक तब्बसुम काझी यांनी हिंदीतून सामन्यांचे धावते समालोचन केले. सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी लोणशी मोहल्ला मुस्लिम समाजाचे अध्यक्ष इस्माईल पालेकर,उपाध्यक्ष सिराज गैबी , तब्बसुम काझी, शादाब गैबी, मुस्तुफा वाडेकर, अ.मजीद वाडेकर,आसिफ गैबी,हुसैनमिया वसगरे, अ.रज्जाक ताज,अजगर करवेकर, मुन्ना एशविकर, रेहमान पाल,तौफिक काझी, जहीर वाडेकर,शफीक पटेल,अनिस काझी, हाफिज पाल आदींसह क्रिकेट शौकीन व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धा उत्साहात व यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी एव्हरग्रीन क्रिकेट क्लब लोणशी मोहल्ला संघाच्या सर्वच खेळाडू व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version