तळा शहराची पाणी समस्या कायम

| तळा | प्रतिनिधी |

तळा नगरपंचायत क्षेत्रात नागरिकांना एक दिवसाआड एक ते दिड तास पाणी मिळत असल्याने तळावासियांची ही एक नेहमीची पाणी समस्या असून त्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. तळा शहरासाठी अंबेली येथील बोअरवेलच्या माध्यमातून खेच पंपाद्वारे पाणीपुरवठा केला जातो तसेच दुसरे तहसील कार्यालयाजवळील धरणाच्या खालील भागात मारलेल्या बोरवेलद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मेपासून एक,दोन, तर काही वेळा तीन दिवसांनी पाणी मिळते तेही एक ते दीड तास पाणी मिळते. काही भागात तर अर्धातास पाणी अशा या पाणी समस्येमुळे महिलावर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत असून महिलांमधून नाराजी व्यक्त होताना पहावयास मिळत आहे.

तळा शहरातील तहसील जवळील बोरवेलद्वारे श्रीस्वामीसमर्थ नगर तळा-इंदापूर रस्त्या लगत असलेल्या नवीन वसाहत भागात मे महिना सुरु झाल्यापासून दोन ते तीन दिवसांनी पाणी सोडले जात असून एक तास पाणी मिळत असल्याने या भागातील नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. दोन ते तीन दिवसांनी गेले अनेक दिसांपासून पाणी येत आहे. या येणाऱ्या पाण्याला वेग नसल्याने कशेबशे थोडेसे पाणी मिळते ते तुटपुंजे पडते. तसेच तळा शहरातील अनेक भागातही अशीच परिस्थिती असल्याचे महिला वर्गातून नाराजीचे सूर निघत आहेत. अशावेळी नाईलाजास्तव खासगी पाणी पुरवठा करणाऱ्यांकडून विकत पाणी घ्यावे लागत आहे. याचा विचार करता नगरपंचायतीने याकडे लक्ष घालून पाणी समस्या या सोडवावी अशी संतापजनक अपेक्षा या भागातील महिलांमध्ये व्यक्त होत आह

Exit mobile version