। तळा । वार्ताहर ।
तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे बालविकास व प्राथमिक विद्यामंदिर, गो.म. वेदक विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय तळाचे वार्षिक स्नेहसंमेलन कलासंगम नुकतेच उत्साहात पार पडले.
गो.म. वेदक विद्यामंदिरचे विविध गुणदर्शन कार्यक्रम व उद्घाटन सोहळा दि. 28 डिसेंबर रोजी पार पडला. यावेळी आदर्श शिक्षक म्हणून सुहास भोईर तर आदर्श विद्यार्थी म्हणून सार्थक कासार व जान्हवी साळवी यांना सन्मानित करण्यात आले. विविध गुण कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत रोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वास्तूशिल्पकार मुख्य वास्तूशास्त्र तज्ञ समीर देशमुख यांची उपस्थिती होती.
बालविकास व प्राथमिक विद्यामंदिरचे रंगमंच पूजन, आदर्श पुरस्कार व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दि. 29 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. रंगमंच पूजन संस्थेचे सचिव मंगेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक ओमकार साठे यांची उपस्थिती होती. यावेळी आदर्श शिक्षक म्हणून मुख्याध्यापक सचिन भाटे तर आदर्श विद्यार्थी म्हणून श्लोक शिर्के व प्रज्ञा महाजन यांना सन्मानित करण्यात आले. तद्नंतर विद्यार्थ्यानी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
तसेच, कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रंगमंच पूजन, आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन दि. 30 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. रंगमंच पूजन संस्थेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक श्री मोहन वर्तक यांची उपस्थिती होती. यावेळी आदर्श शिक्षक म्हणून पी.एम. गायकवाड तर एन.सी. पाटील व एन.टी. मचे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. आदर्श विद्यार्थी म्हणून कस्तुरी तळकर, परेश बावधने, वैष्णवी बेडेकर, उपेंद्र कुलकर्णी, ओमकार बटावळे व जयश्री काप यांना सन्मानित करण्यात आले.
तळा विद्यामंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन
