नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
अफगाणिस्तानमधील चौथे मोठे शहर असलेल्या ‘मजार-ए-शरीफ’वर आता तालिबानाने ताबा मिळवला आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तान सरकारच्या हातून हळूहळू एक-एक शहरं निसटत असल्याचे दिसत आहे. काबुल आणि जलालाबाद सोडून तालिबानकडून उत्तर अफगाणिस्तानमधील एक प्रमुख शहर असलेल्या मजार-ए-शरीफ वर ताबा मिळवण्यात आला आहे.
रॉयटर्सने स्थानिक अधिकार्यांचा हवाला देत सांगितले आहे की, तालिबान बंडखोरांनी मजार ए शरीफ वर जवळपास निर्विरोध प्रवेश केला, कारण सुरक्षा रक्षक राजमार्गावरून शेजारील उज्बेकिस्तानच्या दिशेने पळाले. सोशल मीडियावरील अनेक व्हिडिओंमध्ये अफगाणिस्तान आणि उज्बेकिस्तानमधील हेरातनदरम्यान असलेल्या लोखंडी पुलावर अफगाण सैन्याची वाहनं आणि सैन्य वर्दीतील व्यक्ती दाखविण्यात येत आहेत.