| रसायनी | प्रतिनिधी |
बिर्ला कार्बन इंडिया प्राइवेट लिमिटेड पातळगंगा यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत रायगड जिल्हा परिषद शाळा इसांबे येथे बोलक्या भिंती प्रकल्प व शाळा सुशोभीकरण उद्घाटन समारंभ पार पडला. सदर कार्यक्रमास रवींद्र रघुवंशी, निखिल भामरे उपस्थित होते. बिर्ला कार्बन पाताळगंगा कंपनीमार्फत खालापूर तालुक्यातील 50 पेक्षा जास्त प्राथमिक शाळांमध्ये बोलक्या भिंती हा अनोखा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे. सदर प्रकल्पामुळे शाळेचा संपूर्ण कायापालट होताना दिसत आहे व विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये वेगळे चैतन्य पहावयास मिळत आहे. सदर कार्यक्रमासाठी संतोष बैलमारे, गौरी गडगे, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग उपशिक्षणाधिकारी सुनील भोपळे, दीपा परब गटशिक्षणाधिकारी खालापूर जे. पी. परदेशी, किशोर परदेशी, नंदा मोहिते आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक अंजली परदेशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती ते सर्व सदस्य व ग्रामपंचायत सदस्य सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामसेवक यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमासाठी माजगाव केंद्रातील तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.
इसांबेत बोलक्या भिंती प्रकल्प
