तळोजात वीज संकट

। पनवेल । वार्ताहर ।
तळोजा वसाहत फेज दोनमध्ये महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीला सिडकोच्या विद्युत विभागाकडून वीजपुरवठ्यासाठी लागणारी केबल उपलब्ध करून दिली जाते, मात्र उपकेंद्रात ती धूळ खात पडून आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वी सिडकोने उपकेंद्राची केबल जोडणी केली नसल्याने नागरिकांवर विजेच्या लपंडावाला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. तळोजा फेज दोन वसाहतीमध्ये जवळपास दहा हजार ग्राहक आहेत. त्यामुळे या परिसरात उपकेंद्र नसल्यामुळे तळोजा फेज एकमधील उपकेंद्रातून तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा केला जात आहे. अशातच नवीन वर्षात बेलापूर- पेंधर मेट्रो सुरू होणार असल्यामुळे फेज दोन परिसरात नागरिकांच्या संख्येत कमालीची वाढ होणार आहे.

त्यामुळे नागरिकांना भेडसावणार्‍या संभाव्य वीज समस्येसाठी महावितरणच्या वतीने सेक्टर 18-प्लॉट, क्रमांक 50 भूखंडावर 33 बाय 11 केव्ही उपकेंद्र उभारून वर्षे लोटला आहे. तसेच या उप-केंद्राला स्वतंत्र वीज जोडणी खारघर अथवा रोडपाली येथील महावितरणच्या मुख्य उपकेद्रांमधून उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र वीज जोडणीसाठी लागणार्‍या केबल वाहिन्या पुरवण्याचे काम हे सिडकोच्या विद्युत विभागाचे असताना केबल वाहिन्या पुरवठा करणार्‍या एजन्सी उपलब्ध करून दिले जात नसल्यामुळे महावितरण कर्मचारी, तसेच तळोजा फेज दोनमधील रहिवाशांमध्ये नाराजी आहे.

Exit mobile version