तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात

जिल्हास्तरावर कौशल्य दाखवण्याची संधी

। माणगाव । प्रतिनिधी ।

‘चला खेळूया, आनंदी होऊया’ हे ब्रीदवाक्य डोळ्यांसमोर ठेवून शिक्षण विभाग पंचायत समिती माणगाव यांच्यावतीने तालुकास्तरीय क्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धांचे आयोजन गोरेगाव येथील ना.म. जोशी विद्याभवनात करण्यात आले होते. या स्पर्धांचे उद्घाटन गोरेगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्वे यांच्या हस्ते व गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

स्पर्धेदरम्यान क्रीडा प्रकारांमध्ये लंगडी, लगोरी, दोरी उडी, बेचकी आदी खेळांचा, तर व्यक्तिमत्व विकास स्पर्धांमध्ये पारंपारिक नृत्य, पथनाट्य, समूह गायन व माती शिल्प आदी कलाविष्कारांचा समावेश करण्यात आला होता. या स्पर्धांमधील सर्व विजेते व उपविजेत्यांना मेडल्स व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच, या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकावर विजेते ठरलेल्या क्रीडापटू, कलाकार व संघांना जिल्हास्तरावर आपले कौशल्य दाखवण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

क्रीडा स्पर्धांचे निकाल
लहान गट- लंगडीः
प्रथम गोरेगाव बीट, द्वितीय तळाशेत बीट, तर तृतीय निजामपूर बीट. लगोरीः प्रथम गोरेगाव बीट, द्वितीय साई बीट, तर तृतीय उतेखोल बीट. दोरी उडीः प्रथत सांच काठाडे, द्वितीय श्रुती वाघमारे, तर तृतीय सानिका बागवे. बेचकीः प्रथम मयूर जाधव, तर द्वितीय शैलेश हिलम.
मोठा गट- लंगडीः प्रथम उतेखोल बीट, द्वितीय कडापे बीट, तर तृतीय निजामपूर बीट. लगोरीः प्रथम तळाशेत बीट, द्वितीय उतेखोल बीट, तर तृतीय साई बिट. दोरी उडीः प्रथम ऐश्‍वर्या जाधव, द्वितीय वैशाली हिलम, तर तृतीय धनश्री रेवाळे. बेचकीः प्रथम राहुल जाधव, द्वितीय सचिन पवार, तर तृतीय योगेश वाघमारे.
व्यक्तिमत्व विकास स्पर्धांचे निकाल
लहान गट- पारंपारिक नृत्य:
प्रथम तळाशेत बीट, द्वितीय गोरेगाव बीट तर, तृतीय साई बीट. पथनाट्य: प्रथम साई बीट, द्वितीय तळाशेत बीट, तर तृतीय गोरेगाव बीट. समूह गायन: प्रथम तळाशेत बीट, द्वितीय गोरेगाव बीट, तर तृतीय उत्तेखोल बीट. माती शिल्प: प्रथम अक्षरा सूर्यवंशी, द्वितीय अलोक सुतार, तर तृतीय समिधा सहस्त्रबुद्धे.
मोठा गट- पारंपारिक नृत्य: प्रथम गोरेगाव बीट, द्वितीय तळाशेत बीट, तर तृतीय निजामपूर बीट. पथनाट्यः प्रथम उतेखोल बीट, द्वितीय कडापे बीट, तर तृतीय निजामपूर बीट. समूह गायन: प्रथम उतेखोल बीट, द्वितीय निजामपूर बीट, तर तृतीय गोरेगाव बीट. माती शिल्पः प्रथम आर्यन भिलारे, द्वितीय सोहम सुतार तर तृतीय आस्था मालोरे.
Exit mobile version