खोपोलीत तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा उत्साहात

| खोपोली | प्रतिनिधी |

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शासन मान्य क्रीडा स्पर्धांची सुरुवात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेने झाली. तालुका स्तरावर कुस्ती, मैदानी, हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, आणि बुद्धिबळ या खेळाचे आयोजन करण्यात येते. त्यापैकी कुस्ती स्पर्धेची सुरुवात खोपोली येथील कारमेल स्कूल येथे झाली, असे खालापूर तालुका क्रीडा समन्वयक जगदीश मरागजे यांनी उद्घाटन कार्यक्रमासमयी सांगितले.

याप्रसंगी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर निर्मल मारिया, केटीएसपीचे कार्यवाह किशोर पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मारुती आडकर, रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष सुभाष घासे, उपमुख्याध्यापिका सिस्टर आयविन, खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे खजिनदार जितेंद्र सकपाळ, राज्यस्तरीय पंच राजाराम कुंभार, श्री. पायमोडे, भरत शिंदे, सुधाकर थळे, क्रीडा शिक्षक समीर शिंदे, अमित विचारे, धनश्री गौडा, जयश्री नेमाने, विनोद जाधव, श्री भल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.

तालुका स्तरावर विजयी खेळाडूंची जिल्हा स्तरावर निवड होणार आहे. रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, क्रीडा अधिकारी सचिन निकम, राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या व आयोजकांचे अभिनंदन केले आहे.

Exit mobile version