तांबडमाळ चिंबोड स्वप्नातील गाव घोषित

| पाली/ गोमाशी । वार्ताहर ।

स्वदेस फाउंडेशन चे संस्थापक रॉनी आणि झरीना स्क्रूवाला यांच्या विचारांतून प्रेरित होऊन सुधागड तालुक्यातील तांबडमाळ-चिंबोड मंगळवार (27) रोजी बनले स्वप्नातील गाव.

स्वदेस फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली गावात दोन वर्षांपूर्वी संपूर्ण गावाला एकत्रित करून गाव विकास समिती स्थापन करण्यात आली होती. गावात हरित क्रांती, वृक्ष लागवड, पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, पथदिवे, हागणदारी मुक्त गाव, शासकीय पेन्शन, शासकीय मूळ कागदपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, महिला बचत गट, आर्थिक साक्षरता प्रशिक्षण, घरकुल योजना, करिअर मार्गदर्शन, कौशल्य प्रशिक्षण, डिजिटल शाळा, समृद्ध अंगणवाडी, सौर पथदिवे, 100% कुटुंबांना सौरऊर्जा सर्व कुटुंबांचा आरोग्य विमा अशा अनेक उपक्रमातून गाव आदर्श बनविले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून झरीना स्क्रुवाला, सोनाली कुलकर्णी, मंगेश वांगे, तहसीलदार दिलीप रायन्नावर, अशोक महामुनी, पोलीस निरीक्षक विश्‍वजित काईगडे, पी. डी. डूमना, पारु चौधरी, योगेश मोरे, सुनील पानसरे, वामन सुतक, हितेश मेहता, राहुल कटारिया, तुषार इनामदार, शिवदास वायाळ, समिर शेख, सुश्मिता मूर्ती, श्रीधर कोकरे, किरण शिंदे आणि आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version