तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटना! ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचे निधन

। तामिळनाडू । वृत्तसंस्था ।
तमिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह 13 जणांचा बुधवारी मृत्यू झाला. या दुर्घटनेत वरुण सिंग गंभीर जखमी झाले होते. ते जवळपास 45 टक्के भाजले होते. त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. ज्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन येथे सीडीएस बिपिन रावत व्याख्यानासाठी गेले होते, त्याच सुलूर हवाई तळावर वरुण सिंग विंग कमांडर होते.

ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांची प्रकृती चिंताजनक असली तरी स्थिर असल्याचे भारतीय हवाई दलाच्या अधिकार्‍यांनी 12 डिसेंबरला सागितले होते. वरुणच्या तब्येतीत चढ-उतार होत आहेत, परंतु एक सैनिक असल्याने तो ही लढाई जिंकेल, असा विश्‍वास भोपाळ येथे राहणारे त्यांचे निवृत्त वडील कर्नल केपी सिंग यांनी व्यक्त केला होता.

सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा, उत्तम तज्ज्ञ त्यांच्यावर उपचार करत होते. संपूर्ण देश त्याच्यासाठी प्रार्थना करत होते. त्याला ओळखत नसलेले किंवा सेवानिवृत्त झालेले किंवा सेवा देणारे बरेच लोक भेटायला जात होते. अनेक महिला देखील त्याला भेटायला जात होते. तो एक सैनिक आहे आणि तो लवकरच ही लढाई जिंकून बाहेर येईल, असे केपी सिंग म्हणाले होते. मात्र दुर्दैवाने बुधवारी वरुण सिंग यांची मृत्यूसोबची झुंज अपयशी ठरली.

एक वर्षापूर्वी वरुण सिंग उड्डाण करत असलेल्या एका लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्टच्या सिस्टीममध्ये बिघाड झाला होता, परिणामी त्यांनी एअरक्राफ्टवरील नियंत्रण पूर्णपणे गमावले होते. मात्र, मोठ्या हिमतीने त्यांनी विमान उतरवण्यात यश मिळवले होते. त्यांच्या या शौर्यासाठी त्यांना यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनी शौर्यचक्र प्रदान करण्यात आले होते.

Exit mobile version