। पनवेल । वार्ताहर ।
एलएचएस ब्लॅक ऑइलने भरलेल्या टँकरला अचानकपणे आग लागल्याची घटना पनवेलजवळील करंजाडे परिसरात सोमवारी (दि.14) सकाळच्या सुमारास घडली आहे.
ऑईल टँकर (एमएच-15-ईजी-7634) 18 हजार लिटर एलएचएस ब्लॅक ऑइल भरून जेएनपीटी महामार्गाने खोपोली येथे जात असताना सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमाराला करंजाडे याठिकाणी टँकरमधील चालकाच्या केबीनमधून आग लागली. या घटनेची पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, पोहवा योगेश भोईर, पोलीस अंमलदार रुपेश ठाकूर, निलेश ठाकूर, विनोद घोडे, निकम, प्रकाश भोरे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचले. महानगरपालिका फायर ब्रिगेड टँकरची आग विझवत असताना तांत्रिक बिघाड झाल्याने वपोनि संजय पाटील यांनी पीटर मोबाईलमधून फायर एक्सटेंशन काढून आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच, थोड्या वेळात सिडको फायर ब्रिगेड आल्यानंतर पूर्णपणे आग विजवण्यात आली. या आगीमध्ये टँकर चालकाच्या केबिनचे नुकसान झाले असून या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.