| पनवेल | वार्ताहर |
टँकरने कारला दिलेल्या धडकेत कारमधील दोघेजण जखमी झाले आहेत. या अपघाता प्रकरणी टँकर चालकाविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभाकर जाधव हे त्यांच्या परिवारासह असे एकूण पाचजण कारमधून एका कार्यक्रमासाठी जात होते. यादरम्यान मुंब्रा-पनवेल महामार्गावरील आरएएफ सिग्नलच्या पाठीमागे ते थांबले होते. त्यावेळी त्यांच्या मागून येणाऱ्या भरधाव टँकरने त्यांच्या गाडीला पाठीमागून धडक दिली. धडक बसताच जाधव यांची गाडी बाजूला उभ्या असलेल्या गाडीला जाऊन धडकली.तसेच, टँकर चालकाने जाधव यांच्याशी अरेरावीची भाषा करून हातात लोखंडी रॉड घेऊन त्यांना मारहाण केली. त्यानंतर टँकर चालक व क्लिनर पळून गेले. त्या अपघातात प्रभाकर जाधव आणि त्यांची पत्नी सजीथा या गंभीर जखमी झाल्या आहेत.