। वाघ्रण । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील वाघ्रण येथील रहिवासी तन्मय गिरीश पाटील याने पेण येथील ‘मिस्टर रायगड’ या फॅशन शो स्पर्धेत ‘बेस्ट पर्सनॅलिटी ऑफ रायगड’चा किताब पटकाविला आहे. तन्मय हा पीएनपी महाविद्यालयाचा विद्यार्थी असून, कला शाखेत पदवीचे शिक्षण घेत आहे. त्याच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
पेण येथे 26 मार्च रोजी स्वररंग फेस्टिव्हल 2021-22 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित मिस्टर रायगड स्पर्धेत वाघ्रणच्या तन्मय पाटील यास बेस्ट पर्सनॅलिटी ऑफ रायगड पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत संपूर्ण जिल्हाभरातून एकूण 19 युवकांनी सहभाग घेतला होता. यातून तन्मय पाटील याची निवड करण्यात आली. उंची, बांधा, स्टाईल, हावभाव आदी बाबींचे परीक्षण या स्पर्धेत करण्यात आले.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी राजेंद्र साळवी यांच्या हस्ते सन्माचिन्ह देऊन तन्मयचा गौरव करण्यात आला. या यशाबद्दल तन्मयचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. सेवाश्रम सामाजिक संस्था रायगडच्या वतीने अध्यक्ष रायगड भूषण पत्रकार दीपक पाटील यांनीदेखील त्याचे कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेतील यशाबद्दल मी समाधानी असून, याच क्षेत्रात पुढे करिअर करण्याचा विचार असल्याचे मत यावेळी तन्मयने व्यक्त केले. तसेच उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याबद्दल आयोजक स्वररंगला धन्यवाद दिले.