महिलांचा आंदोलनाचा इशारा
। बोर्लीपंचतंन । प्रतिनिधी ।
म्हसळा तालुक्यातील खानलोशी येथे येत असलेल्या 98 हेक्टर जमिनीवर होणार्या एमआयडीसी खानलोशी प्रकल्पाला गोंडघर ग्रामस्थांचा कडाडून विरोध होताना दिसत आहेत.
सुमारे 98 हेक्टर जमीनीवरील एमआयडीसी प्रकल्पासाठी पिढ्यान्पिढ्या वसलेली काही पक्की घरे, गुरा ढोरांचे वाडे, ज्या शेतजमिनी कसल्या जात आहेत त्या जमीनी शासनाला देण्यास गोंडघर ग्रामस्थांनी विरोध केला असून वेळ पडल्यास उग्र आंदोलन करु असाही इशारा येथील महिलांनी व आगरी समाज अध्यक्ष व गोंडघरचे माजी सरपंच व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते स्वप्निल बिर्हाडी यांनी दिला आहे. बुधवारी सायंकाळी तातडीने घेण्यात आलेल्या बैठकीत महिलांचे उग्र स्वरुप पहायला मिळाले. यावेळी उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही महिला संघटनेकडून देण्यात आला.
98 हेक्टर जमीनीवरील चखऊउ प्रकल्पास ,साठ ते सत्तर टक्के जमीनी,बरोबर ईमारती घरे ही गोंडघर ग्रामस्थाचीचं जात असल्याने आम्हाला करोडो रुपये एकरी भाव दिला तरी येथील ग्रामस्थ जमीनी देण्यास नकार दर्शवित असल्याची व्रुत्त आहे.
या प्रकल्पास आमचा विरोध नाही. पण आमच्या घरादारावर नांगर फिरवून आम्हाला देशोधडीला लावून जर शासन एमआयडीसीसाठी जमिनी ओरबडून घेणार असेल तर हा डाव हाणून पाडू.
स्वप्निल बिर्हाडी, शेकाप कार्यकर्ते