। अलिबाग । वार्ताहर ।
दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अरविंद केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानावर भाजपाने केलेल्या हल्ल्याने आम आदमी पार्टीने अलिबाग येथे जाहीर निषेध नोंदविला आहे.
केजरीवालांच्या शासकीय निवासस्थानावर भाजपाने केलेला हल्ला हा त्यांच्या हत्येचा कट असल्याचे आमआदमी पार्टीचे म्हणणे आहे.केजरीवाल करीत असलेल्या कामामुळे अन्य पक्षांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळेच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर हल्ले होत असल्याचे आमआदमी पार्टीचे म्हणणे आहे. परंतू आशा हल्ल्यांना घाबरुन अरविंद केजरीवाल व आमआदमी पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते जनतेच्या हिताचे निर्णय घेतच राहणार असल्याचेही आम आदमी पार्टीने नमूद केले आहे. तसेच आम आदमी पार्टी या हल्याचा रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी सनदशीर मार्गाने निषेध नोंदवत आहे.अलिबाग येथील निषेधावेळी आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र युवाध्यक्ष अजिक्य शिंदे, जिल्हाध्यक्ष मनोज घरत, आम अदमी पार्टीचे नेते व जिल्हा मिडीया प्रभारी दिलीप जोग, उपजिल्हाध्यक्ष श्रीकांत शिंदे, आप अलिबाग विधानसभा मा.अध्यक्ष अॅड.अजय उपाध्यक्ष, राजेंद्र वाघ, शबाना शेख व कार्यकर्ते उपस्थित होते.