तन्वी म्हसकेने पटकाविला तृतीय क्रमांक

। पाली/बेणसे । वार्ताहर ।

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) यांच्यामार्फत आयोजीत केलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत सुधागड तालुक्यातील वावे येथील तन्वी मंगेश म्हसके हीने सुकेळीतील जिंदल माउंट लिटेरा झी स्कूलमध्ये बारावी सायन्स सीबीएसई बोर्ड परीक्षेत 90. 40 टक्के गुण मिळवून स्कुलमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला आहे. या यशात मोलाचे आणि परिक्षाभिमुख मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका मिस लिली रॉय, शिक्षक गौरी शंकर प्रसाद, ओंकार खोंडे, पूजा ईसाई, व्यंकटेश ममद्याल, सुविज्ञा म्हात्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Exit mobile version