। कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील कोलाड परिसरातील पुगाव गावची सुकन्या तन्वी मिलिंद लहाने हिची दक्षिण कोरियात मर्चंट नेव्हीमध्ये नियुक्ती झाली आहे. तन्वीचे दहावी पर्यंतचे शिक्षण हे कोलाड मधील महात्मा फुले संस्था येथे झाले. तर, पुढील शिक्षण कोलाड हायस्कूल येथे पूर्ण केले. तन्वीने जिद्द, चिकाटी व अथक परिश्रमाने यशाचे शिखर गाठले असून तिने मिळवलेल्या यशाचे पुगांव गावासह रोहा तालुक्यात तसेच संपूर्ण रायगड जिल्ह्यात कौतुक केले जात आहे. तिने घेतलेली भरारी खरंच कौतुकास्पद आहे. तसेच, तन्वीने घेतलेल्या भरारीचे संपूर्ण श्रेय आपल्या आई-वडिलांना दिले आहे.