| कोलाड | वार्ताहर |
कोलाड खांब विभागांतील सामाजिक कार्यकर्ते रवींद्रशेट तारू यांच्या मातोश्री नर्मदा काशिनाथ तारू यांच निधन झाले. त्याबद्दल माजी आ. पंडित पाटील यांनी नुकतीच तारू कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केल. यावेळी कृऊबाचे मढवी, संभे ग्रामपंचायत सरपंच समीर शेट महाबळे, प्रवीण देशमुख, आदीसहबबलूशेट सयद, महेश ठाकूर, राजू शिर्के, विजय पाटील, भिंगारे नंदू लोखंडे आदीनीही सांत्वन केले. तारू यांचा दशक्रियाविधी बुधवारी (दि.9) उद्धव पाली येथे तर अंतिम धार्मिक विधी शुक्रवारी (दि.11) त्यांच्या राहत्या निवासस्थानी कोलाड हिल्स सोसायटी नाना -नानी पार्क जवळ डिव्हिजन कॉलनी रोड कोलाड येथे होणार आहे.