| पनवेल | वार्ताहर |
तळोजा औद्योगिक वसाहती मध्ये असलेल्या विस्टा प्रोसेस फूड्स प्रायव्हेट लिमिटेडच्यावतीने आज पनवेल शहरातील रा. स्व. संघ जनकल्याण समिती डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयास डायलेसिस रुग्णांना मदत म्हणून तीन लाखांचा धनादेश कंपनीचे एम.डी. भुपेंदर सिंग यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
यावेळी कंपनीचे एम डी भूपेंद्र सिंग यांनी दिलेला धनादेश रुग्णालयाचे कार्यवाह राजीव समेळ व मुख्य संचालक व्यवस्थापक सुनील लघाटे व रुग्णालय जनसंपर्क अधिकारी प्रसन्न खेडकर यांनी स्वीकारला. यासाठी कंपनीचे सल्लागार चंद्रशेखर सोमण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी झालेल्या चर्चेत एम डी भूपेंद्र सिंग यांनी रुग्णालय करत असलेल्या कामाचे कौतूक केले.
चार वर्षांपूर्वी त्यांनी डायलेसिस साठी लागणारा आर ओ प्लांन्ट बसवून दिला होता. डायलेसिसचे प्रमाण खूप वाढत आहे. गरीब रुग्णांना हा खर्च करणे न परवडणारा आहे. पटवर्धन रुग्णालयात दानशूर व्यक्तीच्या मदतीने केवळ 500 रुपयात डायलिसिस केले जाते. हा दर अजून कमी करण्याचा रुग्णालयाचा विचार आहे यासाठी मी कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बोलून विदेशातून काही मदत करता येईल का या साठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. कंपनी व रुग्णालय या मधिल दुवा म्हणून कंपनीचे सल्लागारचंद्रशेखर सोमण यांचे रुग्णालय व्यवस्थापन समिती कडून विशेष आभार मानण्यात आले.