| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या नावाचे साधर्म्य असलेले सुनील तटकरी नावाने आणखी एकाने अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत साधर्म्य नावामुळे महायुतीचे तटकरे अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सुनील तटकरे यांचा प्रचार सुरु आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यासोबत त्यांची लढत होणार आहे. अनंत गीतेंना अडचणीत टाकण्यासाठी त्यांच्या नावाने साधर्म्य असलेल्या दोन व्यक्तींनी उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला. मात्र यामध्ये सुनील तटकरेंनादेखील अडचणी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सुनील तटकरे यांच्या नावाने साम्य असलेले सुनील तटकरी यांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सुनील तटकरी यांच्या नावामुळे सुनील तटकरे यांची मते विभागण्याची शक्यता आहे. सुनील तटकरेंनी अनंत गीते यांच्याविरोधात राजकीय खेळी सुनील तटकरेंनाच भोवणार असल्याचे बोलले जात आहे. एकाच नावाने दोन ते तीन व्यक्ती लोकसभा निवडणुकीत उभे राहिले आहेत. या निवडणुकीत अधिक रंगत वाढणार आहे.