तटकरे तंत्रनिकेतन संघाची बाजी

| कोलाड | प्रतिनिधी |

इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडेंट स्पोर्ट्स असोसिएशनमार्फत क्रीडा स्पर्धा महाराष्ट्रातील विविध तंत्रनिकेतन येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. नुकत्याच बेल्हे-पुणे येथील समर्थ पॉलिटेक्निक येथे राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धा पार पडल्या. या विविध क्रीडा स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील कोलाड गोवे येथील श्रीमती गीता द. तटकरे तंत्रनिकेतच्या विद्यार्थ्यांनीदेखील सहभाग घेतला होता. त्यांनी खो-खो स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करीत बाजी मारली आहे. त्यांना राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या विद्यार्थ्यांचे तटकरे चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त संदीप तटकरे, रजिस्टार अजित तेलंगे, प्राचार्य विपुल मसाल तसेच क्रीडा विभाग प्रमुख चैतन्य भगत, टीम खो-खो मॅनेजर फेकणे, कबड्डी टीम मॅनेजर विनायक पोटफोडे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version