| पाली/गोमाशी | वार्ताहर |
भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशात शिक्षक दिन साजरा केला जातो. या शिक्षक दिनाचे औचित साधून लायन्स क्लब ऑफ नाशिक कार्पोरेट व संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा स्व. नामदेवशेठ खैरे सभागृहात संपन्न झाला. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना सन्मानचिन्ह आणि सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सुधागड तालुका दुर्गम, डोंगराळ आहे. या ग्रामीण तसेच आदिवासी भागातील विद्यार्थी घडविण्याचे काम हे शिक्षक करत असतात. यांचा कुठे तरी सन्मान व्हावा म्हणून तालुक्यातील प्रत्येक माध्यमिक विद्यालयातील एक शिक्षक यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हा सोहळा संपन्न करण्यात आला. तालुक्यातील ज्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले त्या सर्वांना सुरेश खैरे यांनी शिक्षण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी भोराई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुरेश खैरे, लायन्स क्लब प्रकल्प संचालक सागर बोंडे, सुनील पाटील, सुनील निकुंभ, अनिल शिरापुरे, विजय विधाते, आनंद पाटील, जगदीश सुतार, संजीव ठकोरे, शांताराम लहाने, सखाराम खैरे, तालुक्यातील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पुरस्कार सोहळ्याचे नियोजन भोराई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश खैरे, नांदगाव विद्यालयाचे प्राचार्य संभाजी ढोपे आणि शिक्षक वृंदआणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. या कार्यक्रमाची प्रस्ताविक प्राचार्य संभाजी ढोपे तर सूत्रसंचालन अशोक शिंदे, महेंद्र जाधव आणि आभार प्रदर्शन बबन पालवे यांनी केले.
गेली 25 वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य करत आहे, रायगड जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. मात्र गेली दोन वर्ष हा पुरस्कार देत असताना शिक्षकांचा यथोचित सन्मान केला जात नाही.
सुरेश खैरे, माजी जिप सदस्य
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संतोष भालेराव, तुकाराम कदम, बालू सिनारे, विलास भोसले, संतोष गायकवाड, हिरामण तांडेल, सुजाता चव्हाण, गणेश महाडिक, प्राजक्ता साजेकर, प्राची निंबाळकर, गुरुनाथ शेरमकर, सुजित जगताप, मंदार शिनकर, शितल साजेकर, संदीप दरेकर, सुचिर खाडे, सोनल ठकोरे.