| उरण | वार्ताहर |
सिडको विकसित करत असलेल्या उलवे नोडवासियांना 10 वर्षापासून हक्काची स्मशानभुमी नव्हती. अंत्यविधीसाठी नातेवाईकांना खारघर, बेलापूर येथे जावे लागत होते. परंतू जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत हे मागील दोन ते तीन वर्षापासून स्मशानभूमीसाठी पाठपुरावा करत होते, अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. या स्मशानभूमीचे लोकार्पण 4 सप्टेंबर रोजी घरत यांच्या हस्ते उलवेनोड करण्यात आले. या स्मशानभूमीच्या लोकार्पण प्रसंगी सचिन घरत, अरुण कोळी, रोशन म्हात्रे, राकेश घरत, सचिन येरुणकर तसेच आम्ही उलवेकर मित्रमंडळाच्या महिला भगिनी उपस्थित होत्या.