31ऑक्टोबरला शिक्षक पात्रता परीक्षा

अलिबाग ।शहर प्रतिनिधी ।
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2021 परिक्षा परिषदेमार्फत 31ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे. यापूर्वी परीक्षा 10 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार होती. उमेदवार अधिकृत वेबसाइट -mahatet.in वर अधिसूचना तपासू शकतात. जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, प्रवेशपत्र 14 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान उपलब्ध असेल. चअकअ ढएढ पेपरमध्ये 150 बहु-पर्यायी प्रश्‍न (MCQ) असतात. उमेदवारांना संपूर्ण पेपर सोडवण्यासाठी 90 मिनिटांचा वेळ दिला जातो.

Exit mobile version