शिक्षक संघटनेतर्फे गुणवंतांचा सत्कार

। अलिबाग । प्रतिनिधी ।

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, पालक व सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार व सन्मान सोहळा गुरूवारी (दि.1) पनवेल येथील व्ही.के. हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा कोकण शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व पनवेल पंचायत समितीचे मा. सभापती काशिनाथ पाटील, महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी, पनवेल तालुका स्तरीय क्रीडा व व्यक्तीमत्व विकास स्पर्धा विजेते स्पर्धक, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, परसबाग स्पर्धा, माता पालकांसाठी पाककृती स्पर्धा, स्काऊट गाईड शाळा, शिष्यवृत्ती कार्यशाळा मार्गदर्शक शिक्षक, केंद्र आदर्श शिक्षक, दिव्यांग शिक्षक, उर्दू माध्यम शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला प.न.पा. माजी उपाध्यक्ष गणेश पाटील, तालुका चिटणीस राजेश केणी, सहचिटणीस ज्ञानेश्‍वर मोरे आदींसह साईनाथ पवार, प्रकाश म्हात्रे, लक्ष्मण मोकल, हेमंत पाटील, मनिषा मोरे, दर्शन पाटील, रमेश मोकल, समाधान गावंड, जगदीश घरत, तेजस्वी घरत, पंचायत समिती पनवेलचे सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व शिक्षक उपस्थित होते.

Exit mobile version