घाडी बंधू तर्फे शिक्षकांचा सन्मान

| सोगाव | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी व घाडी बंधू यांच्यावतीने शुक्रवारी (दि.5) शिक्षक दिनानिमित्त येथील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी व घाडी बंधू दरवर्षी आपल्या परिसरातील सर्व शिक्षकांचा सन्मान करत असतात. याहीवर्षी त्यांनी शिक्षकांचा सन्मान सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात सोगाव उर्दू अंगणवाडी सेविका रिजवाना मुल्ला, मदतनीस सुरय्या सय्यद, उर्दू हायस्कूल शिक्षिका तहसीन तडमुड, नेहा कांबळे-घोडपकर, अदिती हरवडे, कृतिका कदम, अक्षता कदम, इकरा कुर, फर्जाना कुर, अरबीना वाकनिस, अमरीन कुर, शिक्षक शैलेश तिर्लोटकर व अजित हरवडे आदींचा सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवरांसह उपस्थित शिक्षक अजित हरवडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. तसेच, हा सन्मान सोहळा दरवर्षी साजरा करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणारे सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी व घाडी बंधू यांचे विशेष कौतुक केले. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश वडे यांच्यासह जिल्हा काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक उपाध्यक्ष लाईक कप्तान, दिलीप मोंढे, नंदकुमार म्हात्रे, अरविंद मसुरकर, सूर्यकांत भऊड, रुस्तुम कुर, सामाजिक कार्यकर्ते सतीश घाडी, सचिन घाडी, सानिका घाडी, संतोष बांद्रे, प्रविण घाडी, महेश नागावकर, संदेश करमेळे, रहूफ कुर, मुनावर कुर, निकेश अनमाने, नितेश ठकरूळ, मयूर अनमाने, प्रतीक अनमाने, सुयोग अनमाने, जयेश हाके, वेदिका मोंढे, म्हात्रे काकी यांच्यासह परिसरातील विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version