। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
शिक्षक समन्वय संघाच्यावतीने 16 ऑगस्टपासून मुबईतील आझाद मैदान येथे शिक्षकांच्या प्रमुख मागण्यासाठी हुंकार आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून गेले 36 दिवस हजारो शिक्षक आझाद मैदानात तग धरून बसले आहेत. परंतु, सरकार वेळकाढूपणा करत आहे. येणार्या मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत निर्णय झाला नाही तर शिक्षक समन्वय संघाच्यावतीने आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.
सर्व न्याय मागण्यासाठी मुंबई तसेच उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य तथा विना अनुदानित कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आंदोलन चालू आहे. या आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सर्व मागण्या मान्य करून शासन निर्णय काढावा, अशी शासनाला विनंती करण्यात आली आहे. तसेच, इतरही शिक्षकांना जाहीरपणे आव्हान केले आहे.