शिक्षक संघाचा वर्धापनदिन

|मुरूड जंजिरा | वार्ताहर |

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ मुरुड संघटनेचा प्रथम वर्धापनदिन स्नेहमेळावा माळी समाज हॉलमध्ये पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष तुकाराम खांडेकर होते. संघटनेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण दांडेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करुन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सदर संघटना ही सेवानिवृत्त शिक्षकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच आपापसातील प्रेम, जिव्हाळा वृद्धिंगत होण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले. यावेळी 75 वर्षांवरील शिक्षक तसेच गुणवंत शिक्षकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी निवृत्त शिक्षिकांच्या समस्या व शंकांचे निरसन जिल्हा संघाच्या प्रतिनिधींनी केले. मेळाव्यासाठी गजानन मुंबईकर, पांडुरंग निरकर ,वैशाली निरकर, सुभाष पारवे, मिलिंद मयेकर, विलास कमाने, श्रीकांत पाटील, प्रमोद मसाल, सदानंद मुंबईकर, सदानंद पाटील, दिलीप गुरव आदींनी परिश्रम घेतले. सैफुल्ला फिरफीरे जनाब यांनी आभार मानले.

Exit mobile version