राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धेसाठी संघ जाहीर

| नागोठणे । वार्ताहर ।

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वर येथे दि.18 ते 20 दरम्यान घेण्यात येणार्‍या राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धेसाठी नागोठणे येथील कचेरी शाळा मैदानावर निवड स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वोत्तम सिलंबम संघाची निवड करण्यात आली. या स्पर्धेत लाठीकाठी फिरविणे, तलवार फिरविणे, दांडपट्टा तसेच भाला फिरविणे, अशा अनेक प्रकारात हा सिलंबम खेळ खेळला जातो. या नाशिक त्र्यंबकेश्‍वर येथे होणार्‍या राज्यस्तरीय पातळीवर खेळण्यासाठी धनंजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा संघची निवड करण्यात आली आहे.

यामध्ये श्रीयश शेडगे, शौर्य धसाडे, उमेद जाधव, अनिश पालकर, पीयूष साळुंखे,अनुप राऊत,अर्थव देवरे, स्मित ठाकूर, स्वरूप सावंत, अनय जगताप, अंश रातवडकर, वेद जाईलकर, दिपांशु माळी, रोहित गायकवाड, श्रेयश शेडगे, समर ठाकूर, तेजस साळुंखे, सम्यक गायकवाड यांची सर्वांची मुलांच्या संघात तर हनी मोदी, गौरी मोदी, रूचल जाना, नेहा दोरे, हर्षिता कामथे, समृद्धी राऊत, समृद्धी भोनकर, श्रेया सिंग यांची मुलींच्या रायगड जिल्हा सिलंबम संघात निवड करण्यात आली.याचबरोबर प्रशिक्षक म्हणून गौरव राऊत तर टीम मॅनेजर म्हणून कुमार सर यांची नेमणूक करण्यात आली.

Exit mobile version