| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ येथील एल ए ई एस शाळेची विद्यार्थिनी असलेली पलक खरात हिने पुणे (आळंदी) येथे झालेल्या राज्यस्तरीय सिलंबम (लाठी)स्पर्धेत स्टिक रोटेशन आणि स्किक फाईट या क्रीडा प्रकारात कांस्य पदकाची कामे केली. त्यामुळे पलक खरात हिची तामिळनाडू येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पुणे (आळंदी) येथे झालेल्या राज्यस्तरीय सिलंबम (लाठी) स्पर्धेसाठी एल. ए. ई .एस. इंग्लिश मिडीयम स्कूलच्या खेळाडूची रायगड जिल्हा संघातून निवड झाली होती. राज्यस्तरीय स्पर्धेत पलक खरात या खेळाडूने स्टिक रोटेशन आणि स्किक फाईट या क्रीडा प्रकारात 14 ते 17 वयोगटात सहभाग घेतला होता. पलक खरातने या गटात उत्कृष्ट खेळ करीत कांस्य पदकाही कामे केली. तिच्या या कामगिरीच्या जोरावर पलकची तामिळनाडू येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र सिलंबम (लाठी) असोसि्ए शनचे अध्यक्ष पाष्या अत्तर, मुंबई विभाग आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष बाळा साठे आणि दिपाली साठे यांनी पलकचे अभिनंदन केले आहे. राष्ट्रीय स्तरावर निवड झाली असलेल्या पाळकचे प्रशिक्षक स्वप्नील अडूरकर, मोहिनी अडूरकर आणि सौरभ खरात यांनी तसेच एल ए ई एस शालेच्या मुख्याध्यापिका अजिता नायर यांनी अभिनंदन केले आहे.