| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रथमच या स्पर्धेत उतरणार आहे. ही स्पर्धा 19 ते 28 सप्टेंबरदरम्यान चीनमधील हांगझोऊ येथे होणार आहेत.
आशियाई क्रीडा स्पर्धेत तिसर्यांदा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. टी-20 प्रकारात ही स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. संघाची घोषणा करताना, बीसीसीआयने ट्वीटरवर लिहिले की, महिला निवड समितीने 19 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2023 या कालावधीत झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी पिंगफेंग क्रिकेट फील्ड येथे होणार्या 19व्या आशियाई खेळ 2022 साठी भारताच्या संघाची निवड केली आहे. महिला क्रिकेट स्पर्धा 19 पासून होणार आहे. भारतीय महिला संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, देविका वैद्य, अंजली सरवानी, तीतस साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मनी, कानू मणी, उमा छेत्री (यष्टीरक्षक), अनुषा बरेडी. राखीव खेळाडू : हरलीन देओल, काशवी गौतम, स्नेह राणा, सायका इशाक, पूजा वस्त्राकर.