बारा वर्ष रखडलेल्या कामांची दखल कोण घेणार?
| गोवे-कोलाड | वार्ताहर |
मागील तेरा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या खड्यांची व्यथा. पहिल्याच पावसात भले मोठे खड्डे पडले असुन या खड्ड्यांचा त्रास प्रवाशांसह वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. तर इंदापूर ते पेण दरम्यान ही मोठी समस्या आहे तसेच मागील तीन चार वर्षापूर्वी या मार्गावरील कोलाड येथील कुंडलिका नदीपात्रावर नव्याने पुल उभारले आहेत. मात्र त्याचे काम आजतागायत अपूर्ण अवस्थेत असून चक्क पुलावरून रहदारी करणाऱ्या पादचाऱ्यांना मोठी तारेवरची करत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. याला जबाबदार कोण, असा प्रश्न सदरील प्रवाशी वर्गाच्या डोळ्यासमोर उभा राहतो.
नदी पात्राच्या पुलाचे काम अद्याप रखडलेले आहे कुंडलीका नदीपात्रावरील अपूर्ण अवस्थेत पुलाला जोडून बनवला गेलेला पादचारी पूल साईडकट्ट्या बिना असल्याने ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांची मोठी तारेवरची कसरत करत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तर पुलावर देखील खड्यांचे सम्राज असून पाणी साचून राहत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा देखील दौरा झाला. येत्या वर्षभरात या मार्गाचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन देऊन गेले. तदनंतर पुन्हा नव्याने कामाचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री ना. गडकरी यांनी करत पनवेल ते इंदापूर मार्ग हा काँक्रीटीकरण होणार असल्याचे सांगीतले असून, आजच्या घडीला अनेक ठेकेदार झाले. वेगवेगळ्या पक्षांचे सरकार आले. मात्र, कोणाच्या कारकीर्दीत या मार्गाचे काम पूर्ण होईल, असा प्रश्नसाऱ्यांना पडला आहे.
कोलाड कुंडलिका नदीपात्रावरील पुल तसेच, त्याला जोडून पादचारी मार्ग पुल हा अद्याप रखडलेले आहे. त्यामुळे या पूलावरून ये-जा करणाऱ्या शाळेतील विद्यार्थी व प्रवाशी वर्गाला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, याबाबत अधिक संबधित अधिकारी वर्गाने याचा गांभीर्याने विचार करून याबाबत उपाय योजना करावी.
दिनकर सानप, सामाजिक कार्यकर्ते