प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अजिंक्य रहाणेच पुनरागमन
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आयपीएल दरम्यान बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. डब्ल्यूटीसी (WTC) चा अंतिम सामना इंग्लंडमध्ये 7 जूनपासून होणार आहे. यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ पात्र ठरले आहेत.
ऑस्ट्रेलियन संघ आधीच जाहीर झाला होता, आता बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे. संघाची कमान पुन्हा एकदा रोहित शर्माच्या हाती असेल. जे भारतीय कसोटी संघातून बराच काळ बाहेर होते, अशा अनेक खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे नाव अजिंक्य रहाणेचे आहे. त्याला कसोटी स्पेशालिस्ट म्हटले जात असले तरी खराब फॉर्ममुळे त्याचे स्थान गमवावे लागले होते, मात्र आता तब्बल 17 महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा टीम इंडियात परतला आहे. याचे कारण म्हणजे आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. येथे तो स्फोटक फलंदाजी करत आहे.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.