रोहित शर्माचे प्रशंसोद्गार, प्रत्येक सामना आम्ही जिंकणारच
। मुंबई । प्रतिनिधी ।
मविराट कोहलीने संघ अशा स्तरावर नेऊन ठेवला की तेथून आम्ही मागे वळून पाहिलेच नाही. गेल्या पाच वर्षात त्याने भारतीय संघाचे नेतृत्व करताने तो ज्या ज्या वेळी मैदानात उतला त्या त्या वेळी त्याने लीड फ्रॉम द फ्रंट वृत्तीनेच नेतृत्व केले. त्यावेळी संघासाठी स्पष्ट संदेश असायचा, प्रत्येक सामना जिंकण्यासाठी सर्व ताकद पणाला लावायची. प्रत्येक सामना जिंकायचाच प्रयत्न करायचा, असा दावा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने केला आहे.
रोहित शर्मा भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा नवा कर्णधार असणार आहे. तो आपल्या पूर्णवेळ कर्णधार म्हणून कारकिर्दिची सुरुवात आगामी दक्षिण आफ्रिका दौर्यापासून करणार आहे. रोहित शर्मा या दौर्याच्या तयारीला लागला आहे. दरम्यान, त्याने भारताचा माजी एकदिवसीय कर्णधार विराटकोहलीबद्दल अनेक वक्तव्ये केली. रोहित शर्माचा हा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या वेबसाईटवर पोस्ट केला आहे.
- आम्ही विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळाताना खूप चांगल्या आठवणी तयार झाल्या. मी त्याच्या नेतृत्वाखाली बरेच क्रिकेट खेळलो आहे आणि त्यावेळी मी प्रत्येक क्षण एन्जॉय केला. मी अजूनही ते करत आहे. – रोहित शर्मा,कर्णधार
एकदिवसीय संघाची धुरा हातात घेतलेल्या रोहित संघाबाबत म्हणाला, मआम्हाला संघ म्हणून आणि खेळाडू म्हणूनही अजून सुधारणा करण्यास वाव आहे. फक्त मी नाही तर संपूर्ण संघ याच्यावर लक्ष केंद्रीत करणार आहोत. आम्ही एक संघ म्हणून उत्तम होण्यावर भर देणार आहोत.फ यापूर्वी रोहित शर्माने 32 एकदिवसीय सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. आता त्याच्याकडे एकदिवसीय आणि टी 20 संघाचे पूर्णवेळ कर्णधारपद आल्यावर त्याने आपल्याला आनंद झाल्याची प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला ममला ही संधी दिल्याबद्दल मी सन्मानित आणि कृतज्ञ आहे. ही एक मोठी जबाबदारी आहे. मी याबाबत खूप आनंदी आहे. हा रोमांचक प्रवास असणार आहे.
प्रत्येक खेळाडूशी संवाद
मज्या ज्या वेळी मला नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. मी गोष्टी साध्या सोप्या ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. यातील महत्वाची गोष्ट होती ती खेळाडूंबरोबर संवाद साधणे आणि त्यांना त्यांची भुमिका स्पष्ट करून सांगणे. एक कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून खेळाडूंशी संवाद साधत त्यांना त्यांच्या भूमिकेबाबत समजावून सांगणे महत्वाचे असते.तो पुढे म्हणाला की, ममी सुद्धा हेच करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे खेळाडूंना त्यांना संघात कोणती भुमिका बजावण्यास घेतले आहे हे स्पष्टपणे समजेल. त्यांना एक खेळाडू म्हणून काय करायचे आहे.असे रोहितने सुचित केलेले आहे.