फ्लॉप खेळाडूंना डच्चू मिळणार
| ढाका | वृत्तसंस्था |
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आता अॅक्शन मोडमध्ये आहे. त्यामुळे उद्या बांगलादेशविरुद्धच्या दुसर्या वनडेसाठी तो टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधील काही फ्लॉप खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमधील 3 फ्लॉप खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखऊ शकतो.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या दुसर्या वनडेच्या प्लेइंग इलेव्हनमधून शिखर धवनला बाहेरचा रस्ता दाखऊ शकतो, त्याच्या जागी इशान किशनला संधी दिल्या जाऊ शकते. इशान किशन हा डावखुरा स्फोटक फलंदाज असून तो सलामीला रोहित शर्मासह टीम इंडियाला चांगली सुरुवात देऊ शकतो. फलंदाजीत शिखर धवनपेक्षा इशान किशन जास्त धोकादायक आहे. शिखर धवनची बॅट शांत आहे, त्यामुळे त्याला दुसर्या वनडेदरम्यान बेंचवर बसावे लागु शकते.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या दुसर्या वनडेच्या प्लेइंग इलेव्हनमधून अष्टपैलू शाहबाज अहमदला बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. दुसर्या एकदिवसीय सामन्यात शाहबाज अहमदच्या जागी अक्षर पटेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाईल. पहिल्या एकदिवसीय सामन्यात शाहबाज अहमद फलंदाजीदरम्यान शून्यावर बाद झाला आणि गोलंदाजीदरम्यान त्याने एकही विकेट घेतली नाही.
भारताची संभाव्य संघ
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, दीपक चहर.