भारताचे एकच लक्ष्य आशिया चषक
| बंगळुरू | वृत्तसंस्था |
भारतीय क्रिकेट संघाने आशिया चषक जिंकण्याच्या इराद्याने खेळाची पूर्ण तयारी केलेली आहे. स्पर्धेसाठी संघ रवाना होण्यापूर्वी सर्व खेळाडू बंगळुरूमधील अलूर येथील शिबिरात सहभागी झालेले होते. तिथून ते श्रीलंकेला मार्गस्थ झाले. आता एकच लक्ष्य आशिषा चषक असा जोष खेळाडूंमध्ये दिसून आला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फलंदाज संजू सॅमसन देखील शिबिरात सामील झाले सॅमसन संघासाठी राखीव खेळाडू श्रीलंकेला जाणार आहे.
बुमराह आणि सॅमसनची चाचणी
श्रीलंकेला जाण्यापूर्वी खेळाडूंना यो-यो टेस्ट सारखी फिटनेस टेस्ट द्यावी लागली. या यादीत कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुबमन गिल या नावांचा समावेश होता. मात्र, आता जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन देखील यो-यो टेस्ट सारखी फिटनेस टेस्ट देऊ शकतात. याशिवाय तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा यांची लवकरच फिटनेस चाचणी होण्याची शक्यता आहे.
बुमराह दीड वर्षानंतर परतला
जसप्रीत बुमराह आयर्लंडविरुद्ध दीड वर्षानंतर पाठीच्या दुखापतीतून संघात परतला आहे. आयर्लंड दौऱ्यावर बुमराहकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली असली, त्याने त्या मालिकेत शानदार पुनरागमन केले आहे. त्याचबरोबर बुमराह आशिया चषकापूर्वी नेटमध्ये जबरदस्त गोलंदाजी करताना दिसला होता.
ऋषभ पंतकडून संघाला शुभेच्छा
भारतीय संघ मंगळवारी (दि. 29) आशिया चषक खेळण्यासाठी श्रीलंकेला रवाना झाला. भारतीय संघाचा राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत सध्या शिबीर सुरू आहे. यादरम्यान, भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने संघाच्या शिबिराला भेट दिली. ऋषभ पंत देखील गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर एनसीएमध्ये सराव करीत आहे. आपल्या संघ सहकाऱ्यांना भेटून तो खूप आनंदित झाला. तो सध्या उपचार घेत आहे. त्यामुळे पंत हा यंदाच्या विश्वचषकला मुकणार आहे. पंतच्या अनुपस्थितीत केएल राहुल हा भारताचा पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक आहे. मात्र तो देखील दुखापतग्रस्त झाल्याने आशिया कपमध्ये पाकिस्तान विरूद्धच्या पहिल्या सामन्यात तो खेळेल की नाही याबाबत शंका आहे. राहुल हा नेपाळ विरूद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. राहुलचा बॅकअप म्हणून संजू सॅमसनची निवड कऱण्यात आली आहे. तो संघासोबत प्रवास करणार आहे.