। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
यंदापासून प्रजासत्ताक दिनाच्या बीटिंग रिट्रीट कार्यक्रमामध्ये ऐ मेरे वतन के लोगो या गीताचा समावेश करण्यात आला. आजच्या घडीला हे गीत माहित नसलेला एकही भारतीय सापडणार नाही. प्रत्येक भारतीयाच्या ठायी राष्ट्रभक्तीचा स्फुलिंग जाणवणारे हे गीत जसे इतिहासात अजयामर आहेस, तशाच त्याच्या स्मृतीही. कारण हे गीत ऐकले अन देशाचे पंतप्रधान पंडित नेहरुंच्या डोळ्यात अश्रू तरळले.
27 जानेवारी 1963 चा तो दिवस. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासह देशभरातील अनेक लोक दिल्लीतील नॅशनल स्टेडीयमवर एकत्र जमले होते. चीनसोबतच्या युद्धाच्या कटू आठवणी देश अजून विसरला नव्हता. अशातच गानसम्राज्ञी लता मंगेशकर उभ्या राहिल्या आणि चीन युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांनी एक गीत गायले.
हे गीत ऐकून तिथे उपस्थित लोकांच्या डोळ्यांतून आपसूकच अश्रू अनावर झाले. स्वतः पंडित नेहरूसुद्धा अश्रू रोखू शकले नाहीत. आज इतकी दशके उलटूनही हे गीत ऐकल्यावर भारतीयांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाहीत. कवी प्रदीप यांनी लिहिलेले आणि सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले हे एक सुप्रसिद्ध हिंदी देशभक्तीपर गीत आहे.
हे गीत 1962 च्या चिनी हल्लयात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना समर्पित करण्यात आले होते. हे गाणं ऐकून इतर लोकांप्रमाणे पंतप्रधान नेहरूसुद्धा स्वतःच्या डोळ्यांतील अश्रू रोखू शकले नाहीत.
इतक्या दशकानंतर आजही कोणत्याही राष्ट्रीय कार्यक्रमात हे गीत वाजल्याशिवाय राहत नाही. हे गीताने अनेकांच्या अंगात देशभक्तीची भावना पेरली.