। नवी दिल्ली । । वृत्तसंस्था ।
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात असून, लता मंगेशकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत आहेत.
भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज गायिका लता मंगेशकरजी यांच्या निधनाने मला अत्यंत दु:ख झाले आहे. अनेक दशकांपासून आपल्या सुरेल आवाजाने भारतातील आणि जगभरातील संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणार्या लताजींच्या निधनाने भारताने आपला आवाज गमावला आहे. – व्यंकय्या नायडू, उपराष्ट्रपती