अवैध रेतीउपसा करणार्‍यांवर तहसीलची कारवाई

दहा सक्शन पंप, एक बोट केली नष्ट
। नवीन पनवेल । वार्ताहर ।
अवैध रेतीउपसा करणार्‍यांवर पनवेल तहसीलने कारवाई करत दहा सक्शन पंप, एक बोट केली नष्ट केली आहे. या कारवाईमुळे अवैध रेतीउपसा करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी कोपरा खाडीत कारवाई करीत दहा सक्शन पंप आणि एक बोट पूर्णपणे नष्ट केली आहे. या कारवाईदरम्यान तहसीलदार विजय तळेकर हे महसूल विभागाच्या टीमसह घटनास्थळी हजर होते. 19 मे रोजी दुपारी तीनच्या दरम्यान भरतीच्यावेळी रेती उत्खनन करण्यासाठी आलेल्या सक्शन पंप आणि बोट महसूल पथकाला दिसताचक्षणी तहसीलदारांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. गॅस कटरच्या सहाय्याने हे रबरी सक्शन पंप नष्ट करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार, तीन सर्कल अधिकारी आणि दोन कोतवाल उपस्थित होते.

Exit mobile version