उपाययोजना करण्याची मागणी
। कोर्लई । वार्ताहर ।
गेल्या अनेक वर्षांपासून मजगांव येथील जूना पूल कोसळलेला असून त्या पूलाच्या तुटलेल्या स्लँबवर काही हौशी मासे पकडण्यासाठी आधार घेत आहेत. वेळप्रसंगी पूलावरील जीर्णावस्थेतील स्लँब नदीत पडून अपघाताची शक्यता लक्षात घेऊन स्लँब व पिलर काढून घेण्याची मागणी जोर धरीत आहे.
मजगांव येथील तत्कालीन एकमेव दुवा असलेला हा पूल पडून अनेक वर्षे झाली. परंतु, यापूलावर जीर्णावस्थेत धोकादायक असलेले स्लँब व पिलर तशाच अवस्थेत असून याकडे संबंधित बांधकाम खात्याचे दुर्लक्ष दिसून येते आहे. याठिकाणी पावसाळ्यात समुद्राच्या भरतीच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर पाणी असते. याच पूलावर काही शौकिनांना अशावेळी मासेमारी करण्याचा मोह आवरत नाही. अशावेळी वेळप्रसंगी हे जीर्ण धोकादायक स्लँब कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन याठिकाणी योग्यती उपाययोजना करण्याची मागणी जोर धरीत आहे.
