खगोलशास्त्राची आवड जोपासण्याचा उपक्रम
| खांदेश्वर | प्रतिनिधी |
बालदिनाचे औचित्य साधून मुलांमध्ये विज्ञान, खगोलशास्त्र आणि अवकाशाविषयी कुतूहल निर्माण करण्यासाठी शिरढोण येथे विनामूल्य आकाशदर्शन आणि दुर्बिणीतून खगोलीय निरीक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. मोबाईल आणि टीव्हीच्या विश्वात रमणाऱ्या मुलांना प्रत्यक्ष आकाशातील ग्रह, तारे आणि खगोलीय घडामोडींची ओळख व्हावी, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या उपक्रमांतर्गत 21 नोव्हेंबर 2026 आणि 12 डिसेंबर 2026 रोजी सायंकाळी 5.45 वाजता शिरढोण येथे आकाशदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आधुनिक दुर्बिणीच्या माध्यमातून अवकाशाचे निरीक्षण करण्याचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव ज्ञानवर्धक आणि कुतूहल वाढवणारा ठरणार आहे. या निरीक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून इच्छुकांनी नाव, पत्ता आणि वय ही माहिती व्हॉट्सअॅपद्वारे 9967584554 या क्रमांकावर पाठवून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शिरढोण येथील अचूक ठिकाण शोधण्यासाठी संतोष टकले यांच्या नावाने गुगलवर शोध घेता येणार आहे. पुस्तकातील विज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेण्याची संधी मुलांना मिळणार असल्याने पालकांनी आपल्या मुलांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
