| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा तालुक्यातील अपघातग्रस्त घोणसे घाटाच्या तीव्र उतार वळणावर बोर्ली येथे सिमेंट वाहतूक करीत असलेला टेम्पो कलंडला. या अपघातात टेम्पोचालक आणि त्याचा सहकारी किरकोळ जखमी झाला आहे.
पनवेल येथून बोर्ली येथे सिमेंट घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा ब्रेक घोणसे घाटातील तीव्र वळणावर निकामी झाला. यामुळे चालक अब्दुल हलीम याचा टेम्पोच्या वेगावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो घाटात कलंडला. अपघातात चालक अब्दुल हलीम आणि त्याचा सहकारी शंकर किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी म्हसळा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.