| पनवेल | वार्ताहर |
खारघर परिसरात घरगुती गॅस सिलेंडर नेणाऱ्या एका टेम्पोला लागलेल्या आगीत टेम्पोचे नुकसान झाले आहे.
भारत गॅस या एजन्सी कडून खारघर परिसरात टेम्पोद्वारे घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जाते. दरम्यान टेम्पो चालकाने खारघर सेक्टर वीस येथील गॅस एजन्सी कार्यालय लगत उभा असलेला टेम्पो सुरु करून रस्त्यावर बाहेर पडताच टेम्पो चालक बसलेल्या कॅबिनमधून धूर बाहेर पडून अचानक आग लागली. टेम्पो चालकाने त्वरित जवळच्या दुकानातून बादलीने पाणी टाकून आग विझविली.
रात्री रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या टेम्पोचे वायर उंदराने कुरतडल्यामुळे शॉक सर्किट होवून अचानक आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी टेम्पो मध्ये सिलेंडर नसल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.