कशेडी घाटात टेम्पो कलंडला

| पोलादपूर | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील धामणदिवी गावच्या हद्दीत टाटा कंपनीचा मालवाहू टेम्पो कलंडल्याची घटना रविवारी (दि.15) पहाटेच्या सुमारास घडली. मात्र, या अपघातात वाहनाचे नुकसान झाले असून, चालक आणि क्लीनर बचावल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पोचालक संचित साबळे (26) हा कोल्हापूरवरून मुंबई दिशेने जात होता. तो पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटातील धामणदिवी गावाच्या हद्दीत आला असताना त्याचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि टेम्पो एका तीव्र वळणावर लोखंडी गर्डरला धडक देऊन कलंडला. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलादपूरचे पोलीस हवलदार रंजेश पवार व कशेडी महामार्गाचे पोलीस टॅपचे सहाय्यक फौजदार राजन माजलकर यांनी घटनास्थळी जाऊन तात्पुरती एकेरी वाहतूक केली. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त टेम्पो महामार्गावरून बाजूला करून वाहतूक पुर्ववत सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले. सुदैवाने या अपघातात चालक आणि क्लीनर यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Exit mobile version