| खालापूर | प्रतिनिधी |
खालापूर पोलीस ठाणे हद्दीत दि. 10 मे रोजी पहाटे 2.50 वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील हाळगाव येथील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर अपघात झाला. लोणावळा येथील काशिमसा वली दर्ग्याकडे जाणारी रिक्षा रस्त्याच्या साईडपट्टीवर उभी असताना आयशर टेम्पोने मागून धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक व प्रवासी जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोउपनि जुंदरे करीत आहेत.
रिक्षाला टेम्पोची धडक; दोघेजण जखमी
