। सातारा । प्रतिनिधी।
साताऱ्यात टेम्पो आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर कंटेनरला आग लागली. यात दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.
कोरेगाव तालुक्यातील अंबवडे संमत वाघोलीजवळ सोमवारी (दि. 12) पहाटे चारच्या सुमारास हा अपघात घडला. आयशर टेम्पो व कंटेनरची समोरासमोर धडक झाली. यावेळी अपघातानंतर कंटेनरने पेट घेतला. या आगीत होरपळून एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच इतर दोन इतर दोन जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच वाठार पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी अग्निशमन बंब दाखल झाला होता. मात्र, तोपर्यंत कंटेनर जळून खाक झाला. तर आयशर टेम्पोचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.