माथेरानचे दहा नगरसेवक अपात्र

नेरळ | वार्ताहर |
माथेरान गिरीस्थान नगरपरिषदच्या दहा नगरसेवकांना शुक्रवारी रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरवण्याचा निर्णय पारित केला. माथेरानमधील शिवसेनेचे निवडून आलेले नऊ आणि एक स्वीकृत अशा दहा नगरसेवकांनी 27 मे 2021 रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, रायगड जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर दीड महिन्यांच्या आत त्या दहा नगरसेवकांना बाद करण्याचा धडाकेबाज निर्णय घेतल्याने कल्याणकरदेखील यानिमित्ताने प्रकाशात आले आहेत.
2016 मध्ये माथेरान गिरिस्थान नगरपरिषद मधील सार्वत्रिक निवडणूकित शिवसेनेच्या धनुष्यबाण या पक्षचिन्हावर रुपाली तुकाराम आखाडे, प्रियांका विनोद कदम, ज्योती कैलास सोनावले, संदीप नारायण कदम, प्रतिभा प्रदीप घावरे, आकाश कण्हयलाल चौधरी, सुषमा कुलदीप जाधव, राकेश नरेंद्र चौधरी, सोनम सचिन दाभेकर आणि स्वीकृत सदस्य चंद्रकांत धोंडू जाधव अशा दहा सदस्यांनी 27 मे रोजी कोल्हापूर येथे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला होता. या दहा नगरसेवकांना या पालिकेची मुदत संपेपर्यत पक्षांतर बंदी कायद्याखाली अनर्य केले आहे. माथेरान पालिकेच्या विद्यमान सदस्य मंडळाची मुदत जानेवारी 2022 मध्ये संपत आहे. त्यामुळे आगामी निवडणुका जाहीर होइपर्यंत हे सर्व नगरसेवक पालिका सदस्य राहण्यास अपात्र असतील.

Exit mobile version